स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण
कार्य दिशा
स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण च्या विविध कार्य दिशांची ओळख इथे आपण करू घेणार आहोत.
ज्ञानप्रबोधनेच्या स्थापनेपासूनच स्त्रीशक्ती प्रबोधनासाठीच्या कामाचा समावेश होता . मुलींची प्रशाला हे सुरुवातीच्या काळातील मोठे काम .शहरी तसेच ग्रामीण भागात स्त्री शक्तीने स्त्रीशक्तीसाठी गेलेल्या कामाचा अंतर्भाव होता .यातच स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीणचा समावेश झाला . गेली तीस वर्षे हे काम अविरत चालू आहे . शिवगंगा , गुंजवणी , वेळवंडी नदीच्या खोऱ्यातील १५० गावे वाडी वस्त्यांमध्ये ग्रामीण महिलांच्या जीवनसाखळीतील सर्व वयोगटांसाठी हे काम चालते .त्यातही आर्थिक सामाजिक दृष्ट्या पाठीमागे राहिलेल्या गटांसाठी काम करण्याचे धोरण राहिले आहे .सर्व वयोगटातील "तिच्याशी " संबंधित महत्त्वाच्या बहुतांश विषयावर काम चालते .
यामध्ये बाल ,कुमार , किशोरी , युवती ,हिरकणी , प्रौढा ,ज्येष्ठ सदस्य असे सर्व वयोगटासाठी काम चालते . ज्यामध्ये व्यक्तिमत्व विकास , क्षमता संवर्धन , वृत्ती घडण, प्रेरणा जागरण ,आणि कर्ती सामाजिक जाणीव असा भर दिला आहे . यासाठी आर्थिक स्वावलंबन , आरोग्य , समूह गुण विकसन ,नेतृत्व , वंचित विकास ,विस्तार , कार्यकर्ती क्षमता विकास अशा उपक्रमांची रचना केलेली आहे .
कार्य दिशा
१. आर्थिक स्वावलंबन
बचत गट
स्वयंरोजगार
खेळते भांडवल
आर्थिक साक्षरता
२. आरोग्य
जाणीव जागृती
तपासणी
३. समूह गुण विकसन (वृत्ती घडण)
किशोरी
युवती
नवचैतन्य दल
कार्यकर्ता क्षमता विकास
अंतरकेंद्रीय साहचर्य
संघटन
४. नेतृत्व
५. वंचित विकास
सहनिवास
बालवाडी
एकल
कातकरी विकास
६. विस्तार
हिरकणी
अन्य विषय